टँकरने तातडीने पाणीपुरवठा करा; आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी प्रतिनिधी आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण येथील नळयोजनेची विहीर कोरडी पडल्यामुळे पुनर्वसन गावठाणात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे हाल होत आहेत.पुनर्वसन गावठाणात तातडीने टॕकरने पाणी पुरवठा करावा. अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे यांनी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुनर्वसन गावठाणाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आहे.त्यामुळे गेले आठ दिवस पुनर्वसन गावठाणातील नळयोजना बंद पडली आहे.नळयोजना बंद पडल्यामुळे आखवणे, भोम, नागपवाडी गावठाणात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.प्रकल्पग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.सध्या प्रकल्पग्रस्तांना नाईलाजास्तव विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. मे महिना हा मुलांच्या सुट्टीचा व लग्न सराईचा असल्यामुळे गावठणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले असून त्यांचे पाण्या वाचून हाल होत आहेत. तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांवरच पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन पुनर्वसन गावठाणात तातडीने टॕकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. अन्यथा प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक होईल. तरी या निवेदनाचा विचार करुन पाटबंधारे विभागाला सूचना करुन पाणी पुरवठा करावा. अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी सरपंच आर्या कांबळे, धरणग्रस्त यशवंत कांबळे, अभय कांबळे, नारायण कांबळे, काशीनाथ कांबळे, अनिल कांबळे, ऋषीकेश कांबळे, गौरव कांबळे, विक्रम कांबळे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. फोटो- तहसिलदार रामदास झळके यांना निवेदन देताना आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे व धरणग्रस्त छाया संजय शेळके वैभववाडी
