पर्यटन महोत्सवाच्या शोभायात्रेला ढोलताशांच्या गजरात सुरुवात…

मालवण दि प्रतिनिधी पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आणि जिल्ह्याच्या पर्यटनाचे केंद्र बिंदू असलेल्या मालवणमधील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने मालवण नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन मोहोत्सवाच्या भव्य शोभायात्रेला आज ढोलताशांच्या गजरात आणि अपूर्व उत्साहात सुरुवात झाली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरर्गे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शोभायात्रेत मालवणातील प्रतिष्ठित नागरिकां बरोबर पर्यटन व्यावसायिक, चित्ररथ, सजावट केलेल्या रिक्षा, बैलगाड्या या सहभागी झाल्या होत्या.

मालवणच्या पर्यटन व्यवसायाला अधिक गतिमानता मिळावी यासाठी मालवण नगरपालिका आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या वतीने वतीने आजपासून १५ मे पर्यंत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त मंगळवारी मालवण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विविध व्यक्तीरेखा व आकर्षक वेशभूषा यावेळी साकारण्यात आल्या. मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भरड नाका येथे शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपालिका अधिकारी कर्मचारी व सहभागी होते. भरड नाका बाजरपेठ पिंपळपार मार्गे नगरपालिका येथे रॅली सांगता झाली.

मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त शहरात निघालेल्या शोभायात्रेत रिक्षा सजावट, चित्ररथ, घोडेस्वारी, कचरासुर, कोंबडी-मोर नृत्याने रंगत आणली. या शोभायात्रेत मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, माजी नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, जि. प. माजी सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, संमेश परब, बाळु अंधारी, मंदार ओरसकर, छोटू सावजी, अवि सामंत, बाबा मोंडकर, शेखर गाड, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, हेमराज सावजी हे या शोभायात्रेमध्ये उपस्थित होते. बालकरलाकार वेशभूषा साकारल्या यात, सुहान शेखावत – शिवाजी, तनिष्क चव्हाण – वासुदेव, वेदिका कुमठेकर – लक्ष्मण, श्रेया पारकर – राम, तनिष्का – जिजामाता, मायी खडपकर – झांशीची राणी, साहिल तोडणकर – विठ्ठल, महेश वालिकर – तुकाराम, अंगद गावकर – सरदार, रुद्र गावकर – शिवाजी, आदित्य परब – बाहुबली, प्रियल वराडकर – राणी लक्ष्मीबाई, आकांक्षा शेखावत – मीरा, सलोनी शेखावत – शकुंतला, आद्या ओरसकर – मासेवाली, प्रांजल चव्हाण – कोळीण, सान्वी परुळेकर – जिजामाता, आर्वी सावजी -आदीजनांनी सहभाग दर्शविला.

You cannot copy content of this page