पाडलोस रवळनाथचा 10 मे रोजी वाढदिवस उत्सव

बांदा ता.०८-:* पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिराचा वाढदिवस मंगळवार 10 मे रोजी विविध धार्मिक विधींनी साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी होणार असून दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे.

रात्री 9.30 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी ग्रामस्थांनी, भाविकांनी व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page