लोकअदालतीत २९ प्रकरणे निकाली

वेंगुर्ला ता.०९-:* वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ७ मे रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालीत २९ प्रकरणे निकाली निघाली असून ५ लाख ६५ हजार ४२१ एवढी रक्कम वसूल करण्यात आली.

वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात ५ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश के.के.पाटील यांच्या हस्ते झाले. या लोकअदालीत न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदार अशी एकूण १९५ प्रकरणे ठेवण्यांत आली होती. त्यातील २० प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन २ लाख ४८ हजार २४१ रुपये एवढी रक्कम वसूल झाली. तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये विविध बँका, विद्युत मंडळ मिळून एकूण २९३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातून ९ प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन ३ लाख ८ हजार एवढी रक्कम वसुली झाली.

सदरच्या लोक अदालतीचे काम वेंगुर्ला दिवणी न्यायालयाच्या न्यायाधीश के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पॅनेल वकील अॅड.पी.एम.सामंत, अॅड.पूनम नाईक व वकील वर्गाने सहकार्य केले.

You cannot copy content of this page