भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा इशारा
कणकवली ता.०८-:* कणकवली शहरातील हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याकडे जाणारे अपूर्ण गटार काम पूर्ण करा अन्यथा 16 मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी हायवे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कणकवली येथील अपूर्ण गटार काम असलेल्या 10 मीटर लांबीच्या परिसरात 15 दुकाने व 2 घरे आहेत.
येत्या पावसाळ्यात अपूर्ण गटाराचा फटका या स्थानिकांना बसणार आहे. त्यामुळे त्वरित हे गटार बांधकाम पूर्ण करा अन्यथा 16 मे रोजी हॉटेल मंजुनाथ समोर सर्व्हिस रोडवर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिला आहे.
