मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना देवगड पोलिसांच्या नोटीसा

देवगड ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ५ अथवा ५ हुन अधिक व्यक्तिनी जमाव करणेस बंदी घालण्यात आली आहे तसेच लाठी काठ्या दगड,शस्त्रे इत्यादी वस्तू बाळगणे ,व शांतता भंग होईल असे कृत्य करण्यास दि २४ एप्रिल २२ते ८ मे २२ रोजी २४.०० वा. कालावधीपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत मशिदींवरील भोंगे,स्पीकर ४ मे पर्यंत न काढल्यास त्याठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात येईल असे जाहीर केले त्या अनुषंगाने देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार देवगड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यात ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी जमाव करणे,वाद्य वाजविणे गाणे म्हणणे,तसेच धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य करणे यास मनाई असून.यात नमूद केले प्रमाणे तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्या कडून कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य झाल्यास सदर नोटिशीचा भंग झाला म्हणून प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.

You cannot copy content of this page