ओटवणे करमळगाळू पेरणेवाडी रस्त्याचे काम अर्धवट

ग्रामस्थांचे होतात हाल:ठेकेदारावर कारवाई करा ;अन्यथा उपोषण करण्याचा राजेंद्र जाधव यांचा इशारा

सावंतवाडी ता.०४-:* मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ओटवणे करमळगाळू, पेरणेवाडी या रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले असून यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे ठेकेदाराने केलेल्या या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा कुडाळ येथील मुख्यमंत्री सडक कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य राजेश ऊर्फ गुंडू जाधव यांनी निवेदनद्वारे दिला आहे.

ओटवणे येथील करमळगाळू ते पेरणेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामाचे कालावधी 2019 ते 2021 असे दोन वर्षे होता या कालावधी रस्ता पूर्ण न करता सदरच्या ठेकेदाराने काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे त्यामुळे ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची व रहदारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही गैरसोय दूर करून अर्धवट राहिलेला रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा या रस्त्यावरून जाणाऱ्या मराठी शाळेतील विद्यार्थी व लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण झाला असून त्या रस्त्यावर गुरु-ढोरं येत जात असता त्या भागात शेती असल्याने शेतकरी देखील त्रासले आहेत सध्या पावसाचे आगमन होत असल्याने सदरचा रस्ता हा धोकादायक बनला आहे. अपुर्ण अवस्थेत राहिलेला रस्ता १५ दिवसात पूर्ण न झाल्यास दि. १७ मे रोजी कुडाळ मुख्यमंत्री सडक कार्यालयासमोर वाडीतील सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला आहे

You cannot copy content of this page