आयआयटी पवई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बबली राणे यांचा मदतीचा हात

कणकवली ता.०४-:* माणुसकी हा आपला स्वभाव असल्याचे ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी दाखवून दिले असून मुंबई येथील आयआयटी पवई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मदतीला धावत माणुसकीचा धर्म जोपासला आहे. वेळ रात्री दोनची .गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर ओसरगाव येथे फॅन बेल्ट तुटल्याने गाडी बंद पडली. त्याच वेळी रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी निघालेले ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांच्या निदर्शनास टेम्पो ट्रॅव्हलर बंद पडलेली दिसली. गाडीमध्ये आयआयटी पवई इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते .

रात्रीची वेळ असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मेकॅनिक व मटेरियल मिळणे दुरापास्त होते अशावेळी रात्री-अपरात्री मदत करणे हा बबली राणे यांचा स्वभाव असल्यामुळे तात्काळ त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले व जाणवली येथील मेकॅनिक राकेश म्हसकर व अक्षय राणे आधी मित्रांना बोलावले व एक दीड तासाच्या फरकाने नवीन फॅन बेल्ट बसवून गाडी दुरुस्त करण्यात आली रात्री दोन वाजल्यापासून ते गाडी पहाटे साडेचारला मार्गस्थ होण्यापर्यंत बबली राणे यांनी ठाण मांडून रात्री-अपरात्री पर्यटकांना धीर देऊन गाडी रिपेअर करून त्यांची गाडी सुखरूप पणे मुंबईच्या दिशेने रवाना केली व त्यानंतर बबली राणे आपल्या मोहीम फत्ते करून घरी पोहोचले

You cannot copy content of this page