मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटीसा

कणकवली ता.०४-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्या करिता 3 मे ची डेडलाईन दिल्यानंतर जर 3 मेपर्यंत हे भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर आवश्यकता भासल्यास परवानगी घेऊन हनुमान चालीसा वाजवा असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसे कडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती.

दरम्यान संभाजीनगर मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई च्या कलम 149 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर व अन्य सात पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.

You cannot copy content of this page