राजन तेली; अन्यथा भाजप करणार तीव्र आंदोलनराजन
*⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील खाणींमध्ये पर्यावरण विषयक नियमांची पायामल्ली करून परवागीहून जास्त प्रमाणात उत्खनन होत आहे. तसेच त्या खनिजाची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने शासनाने घालून दिलेले निर्बंध मोडले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून योग्य रॉयल्टी भरली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी येत्या आठ दिवसांत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजन तेली यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महेश सारंग, महेश धुरी, गजानन पालेकर, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सत्यवान बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
