राजन तेली यांचा सवाल…
सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सुरू असणाऱ्या खाणीवर चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाला हानी पोचणार काम होत आहेत. तसेच त्या उत्खननाची बेदरकारपणे वाहतूक होत आहेत. वाहतूक करणारे डंपर ओव्हरटेक करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी येत्या आठ दिवसांत यावर कारवाई न केल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील त्यानी यावेळी दिल्या आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारी आमदार एकीकडे महसूल अधिकारी लाच घेतात असा आरोप केले जात आहेत. तसेच सावंतवाडी महसूल अधिकाऱ्यांवर देखील तसे आरोप होत आहेत. परंतु, नंतर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे त्यांच्याशी सेटलमेंट केली जात आहे का? असा सवाल राजन तेली यांनी कोणाकचेही नाव न घेता उपस्थित केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सावंतवाडीचे युवराज भाजप मध्ये जरी आले नसते तरी सावंतवाडी नगरपालिका १०० टक्के भाजपच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. परंतु, युवराज भाजप मध्ये आले असल्याचा आम्हा सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना आनंदच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महेश सारंग, महेश धुरी, गजानन पालेकर, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सत्यवान बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
