खारेपाटण हायस्कुल येथे विविध उपक्रमांचे उदघाटन

कणकवली ता.०२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय,ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रम तसेच खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयातील नूतनीकरण केलेल्या ३ वर्गखोल्यांचे तसेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक बोर्ड,टेनिस कोर्ट,शाळा व्हरांडा सुशोभीकरण, सुसज्ज ग्रंथालय आणि स्टाफरूम नुतनिकरण आदी विविध कामाचा शुभारंभ खारेपाटण हायस्कुल येथे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जि प सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,उपसरपंच इस्माईल मुकदाम,खारेपाटण नगरवाचनलयांच्या अध्यक्ष श्रीम मंगला राणे,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे,खारेपाटण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादा कर्ले,सचिव – महेश कोळसुलकर, खजिनदार – संदेश धुमाळे,संस्थेचे संचालक विजय देसाई,मोहन कावळे, भाऊ राणे,राजेंद्र वरूनकर, राजेश वारंगे,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,मंगेश गुरव, शेखर राणे,नंदू कोरगावकर, खारेपाटण व्यापारी असोसिशन चे अध्यक्ष वीरेंद्र चिके,श्रीम अर्चना तळगावकर ,प्रदीप मोहिरे,सौ प्रनोती पराडकर,सुधाकर कर्ले,मुश्ताक पावसकर,यशवंत रायबागकर, खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री प्रकाश अकिवटे सर,पर्यवेक्षक संजय सानप सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कुलच्या एका वर्ग खोलीचा नूतनीकरणाचा संपूर्ण खर्च श्रीम मंगल राणे यानी केला होता त्यांच्या शुभहस्ते त्या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला तर खारेपाटण हायस्कुल एस एस सी बॅच १९८०-८१ चे प्रमुख विजय देसाई व त्यांचे सहकारी तसेच १९८४-८५ च्या बॅच चे प्रमुख शेखर राणे व त्याचे सहकारी यांच्या माध्यमातून शाळेतील दोन वर्ग खोल्या नूतनीकरण करण्यात आल्या होत्या त्यांच्या शुभहस्ते या वर्गाचे फित कापून उदघाटन करण्यात आले.

तसेच शाळेच्या इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल बोर्डचे उदघाटन पांडू मेस्त्री, शिवाजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.तर शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता बसविण्यात आलेल्या टेनिस कोर्टचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.तर शाळेच्या मुख्य इमारतीच्या व्हरांडयाचे करण्यात आलेल्या नूतनीकरण व सुशोभीकरनाचे उदघाटन नंदकिशोर कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेच्या सुसज्ज ग्रंथालयाच्या वर्गखोलीचे उदघाटन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.व खारेपाटण हायकुलच्या स्टाफरूम नूतनीकरण कामाचा शुभारंभ शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री चिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर शाळेच्या महत्वाच्या अशा कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सुसज्ज सभागृहाचे उदघाटन जि प सदस्य रवींद्र जठार यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमचे प्रास्तविक संजय सानप सर यांनी केले तर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन महादेव मोटे यांनी केले.

You cannot copy content of this page