कॅन्सरग्रस्त, ब्रेन ट्युमर सारख्या रुग्णांना मदतीसाठी आयोजन
सावंतवाडी ता.०२-: हातभार चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने देऊ मायेचा हात उचलू दुःखाचा भार या उक्तीप्रमाणे गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त ब्रेन ट्यूमर यासारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेले तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब पुरस्कृत रेनबो फ्रेंड सर्कल कवठणी निर्मित “शबय” नाटकाचे उद्घाटन माननीय श्री शंकर कोरे पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब माजी नगराध्यक्ष सावंतवाडी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला
विशेष बाब म्हणजे हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने *दोन कॅन्सरग्रस्त व दोन किडनी ग्रस्त गरीब रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयेची मदत* मान्यवरांच्या हस्ते चेकच्या स्वरूपात देण्यात आली.
यावेळी हातभार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रत्नागिरी टाइम्स चे श्री अभिमन्यू लोंढे *”पत्रकार भूषण”* हृदयरोग तज्ञ डॉ अभिजित चितारी *”जीवन दाता”* स्त्री रोग तज्ञ डॉ नेत्रा सावंत *”जीवन संजीवनी”* मार्शल आर्ट प्रशिक्षक श्री वसंत जाधव *”क्रीडा रत्न”* डॉ. श्री चंद्रकांत सावंत *”शिक्षक भूषण”* श्री बाबली गवंडे *”समाज रत्न”* श्री बबन उर्फ बंडा परब *”युवा उद्योजक”* श्री शिव प्रसाद परब *”समाज भूषण”* सौ संजना कांबळे *”आरोग्य सेवारत्न”* तर कुमार विजय तुळसकर *”बाल रत्न”* यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी हातभर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, स.सचिव एकनाथ चव्हाण, स. खजिनदार नयनेश गावडे यांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर केली.
यात श्री सुभाष साबळे *”जिल्हाध्यक्ष”*, श्री रुपेश राणे *”जि.कार्याध्यक्ष”*, श्री श्यामसुंदर सावंत *”जि.सचिव”*, श्री प्रमोद गावडे *”जि.संपर्कप्रमुख”*, श्री प्रसाद साळगावकर *”जि संघटक”*, सौ अस्मिता भराडी महिला *”जिल्हा म. सचिव*” सौ साक्षी गवस महिला *”उपजिल्हाध्यक्ष”*, सौ नम्रता आराबेकर महिला *”सल्लागार”* सौ शमिका नाईक *”जि.म. सदस्य”*,सौ नेहा काष्टे सावंतवाडी म. *”तालुकाध्यक्ष”* सौ प्रांजल आचरेकर म. *”सचिव”* श्रीम. विनिता आराबेकर *”उपतालुकाअध्यक्ष”* सौ. सुप्रिया आराबेकर ता. *”संपर्कप्रमुख”* सौ. लक्ष्मी गावडे ता.*”संघटक”* यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मा. श्री प्रशांत पानवेकर (उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी सावंतवाडी), मा. श्री शंकर कोरे (पोलीस निरीक्षक सावंतवाडी), मा. श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी), माननीय श्री विकास भाई सावंत (मा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस), मा. श्री प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर (मा. नगराध्यक्ष सावंतवाडी), मा. श्री प्रमोद गावडे (मा. सरपंच निरवडे), ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, स.सचिव एकनाथ चव्हाण, स. खजिनदार नयनेश गावडे पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे, पत्रकार संजय पिळणकर, पत्रकार मदन मुरकर, पत्रकार राजाराम धुरी, संजय पेडणेकर,वैभव खानोलकर,प्रकाश तेंडोलकर, दीपक लोके, मकरंद मेस्त्री, सुधीर धुमे,अमित भराडी,सुरेश खवणेकर,गुणाजी पाटेकर, पप्पी कवठणकर, संदेश कवठणकर, बाळा हळदणकर, यामेश कवठणकर,महेश घोगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य हे मानवी सेवेचे कार्य असून प्रेरणादायी आहे. या कार्यात आपण पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे असे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी सांगितले.
हातभार चँरिटेबल ट्रस्ट ने घेतले काम खुप कौस्तुभ अस्पत आहे. कँन्सरग्रस्त, किडनीग्रस्त रुग्णांना मदत करणे हे गरजेचे बनले आहे सध्या अल्पवयीन मुलांना कँन्सर, किडनी सारखे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत ते होऊच नये ,यासाठी होण्याचे कारण समजून घेऊन समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे, तसेच व्यसनमुक्ती दृष्टीने समाजाला धडे मिळणे आवश्यक आहे यासाठी हातभार चारीटेबल ट्रस्ट ने प्रयत्न करावे त्याचप्रमाणे निरोगी राहण्यासाठी व्यायाम, योगा करून आपले शरीर निरोगी, ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे म्हणाले.
संजू परब- हातभार चॅरिटेबल ट्रस्ट हे सेवावृत्त जोपासत गरजू मानवी कल्याणसाठी मोलाचे कार्य करीत असून सर्वांनीच या कार्याला हातभार लावणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सामाजिक कार्यकर्ते धर्माजी गावडे, माघी गणेश जयंती मंडळ सबनीसवाडा, बंड्या परब, अमोल राणे, विल्यम फर्नांडिस, शेखर गावकर, डॉ चंद्रकांत सावंत,अमित वाळके आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
