सावंतवाडी, ता. २ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी क्रमांक १ येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे एकापेक्षाएक सरस सादरीकरण करून वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आकेरीचे सरपंच महेशजी जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी २०१९-२० च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बालचमूंचा दशावतार कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी श्रीमती काजल किरण जोशी यांचा आदर्श व उपक्रमशील शिक्षिका म्हणून ग्रामस्थांच्यावतीने गुलाब पुष्प शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश घोगळे, उपाध्यक्ष श्री. आकेरकर, गावचे पोलीस पाटील हुमरसकर, माजी उपसरपंच वासुदेव सावंत, माजी सरपंच संदीप राणे, माणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, सर्व सदस्य पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक संघ उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सोय शंकर परब यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती काजल किरण जोशी यांनी तर आभार श्रीमती दाभोलकर यांनी मानले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सर्व समित्यांचे उपाध्यक्ष सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय चांगल्याप्रकारे पार पडल्याचे सांगण्यात आले.
