श्री रामेश्वर वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा ३५६वा वर्धापनदिन मंगळवार दि.३ मे (अक्षय्य तृतीया) रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायंकाळी ६.३० वा. श्री रामेश्वराची पालखी व लालखी मिरवणूक त्यानंतर श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page