धवडकी नदीतील गाळ काढण्याबाबत येत्या ७ दिवसात निर्णय घेण्यात येईल…

पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन;रुपेश राऊळ यांनी खासदार आमदार यांच्याशी याबाबत केली चर्चा…

सावंतवाडी ता.०२-:* माडखोल धवडकी नदीतील गाळ ७ दिवसात काढण्यासाठी निर्णय घेण्यात येईल तसेच याबाबत आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्याशी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी चर्चा केल्यानंतर पाटबंधारे विभाग आणि तहसिलदार यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाले.

माडखोल नदी पात्रातील गाळ काढण्याबाबत सुरू झालेले उपोषण स्थगित करण्यात आले. माडखोल नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत महसूल विभागाकडे मागणी करण्यात आली होती. मागील वर्षी पूर येऊन माडखोल धवडकी येथे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच संजय लाड, जाॅकी डिसोजा, सूर्यकांत राऊळ, संतोष राऊळ, रवी गोताड, विशाल राऊळ, प्रदीप शिरसाट, अनिल कोरगावकर,सिध्देश शिरसाट आदी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. यावेळी सरपंच संजय शिरसाट, उपसरपंच शिवाजी परब आदी उपस्थित होते.

शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य गजानन नाटेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार दीपक केसरकर यांच्याशी रूपेश राऊळ यांनी चर्चा केली. यामुळे आजच आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत संजय लाड यांना निमंत्रित करून सात दिवसांत गाळ काढण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले. यानंतर रुपेश राऊळ यांनी सरबत देऊन उपोषण स्थगित केले.

दरवर्षी नदीपात्र स्वच्छ नसल्याने अतिवृष्टी होऊन पुरस्थिती निर्माण होते तसेच गाळ उपसा झालेला नसल्याने पाण्याचा प्रवाह लोकवस्तीत घुसून शेतकऱ्यांच्या भात शेती फळझाडे केळी लागवड व्यावसायिकांचे दुकाने आणि घरांमध्ये नुकसान होत आहे. याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले होते. माडखोल नदीपात्राची साफसफाई करून अतिवृष्टीच्या काळात होणारा मानवी वस्तीतील धोका टाळावा म्हणून मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकार वर्ग उपोषणस्थळी भेट देऊन येत्या सात दिवसात गाळ काढण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये संजय लाड यांना बोलावण्यात आले आहे .पावसाळ्यापूर्वी या नदीचा गाळ काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे माडखोल ग्रामस्थांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

You cannot copy content of this page