कला भविष्यात रोजगार मिळवून देतील-:प्रमोद गावडे…

वेंगुर्ला ता.०२-:* विद्यार्थ्यांनी विविध कलांचे छंद जोपासताना त्यात व्यावसायीक दृष्टीकोन ठेवल्यास त्याच कला भविष्यात रोजगार मिळवून देणा-या ठरु शकतील असे प्रतिपादन सुरंगपाणी कार्यक्षेत्राचे केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांनी केले.

दाभोली इंग्लिश स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण २९ एप्रिल रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमात दाभोली हायस्कूल आयोजित चित्रकला स्पर्धेतील चेतन पेडणेकर, कौशल तांडेल, पलाश राजापूरकर, खूशी मुणनकर, ईशा आरोलकर (सर्व जिल्हापरिषद केंद्रशाळा सुरंगपाणी), मनोहर खाडे, ओमगणेश सामंत, सोहम खानोलकर, गणेश खानोलकर, सांजवी सरमळकर (सर्व खानोली शाळा नं.१), रमाकांत सातार्डेकर, पल्लवी नाईक, चैत्रागौरी नाईक, चैत्रागौरी गावडे, रविंद्र राऊळ (सर्व खानोली-नाईकवाडी शाळा), पूर्वा साळगांवकर, बलराम तोरसकर, मिताली वराडकर, ओंकार तोरसकर, दक्षता म्हाकले (सर्व वायंगणी शाळा नं.२), मयंक दाभोलकर, सृष्टी गोलतकर, साई साळगांवकर, हेरंब गोलतकर, सर्वेश माडकर (सर्व दाभोली नं.१), मनस्वी बांदवलकर, तनया बोवलेकर, सुयश गोखले, सानवी जोशी, अमृता हरमलकर (सर्व दाभोली नं.२) या सर्वांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

गेली तीन वर्षे सतत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपद भूषविणारे आणि कोरोना काळतही शाळेला सर्वोतोपरी मदत करणारे सुनिल राऊत यांचा प्रमोद गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, शामल मांजरेकर, वायंगणी नं.२ चे मुख्याध्यापक रविद्र कांबळे, सहाय्यक शिक्षक रेश्मा चोडणकर, वसंत पवार, स्वप्नाली मुणनकर, स्वप्नाली कांबळी, अश्विनी कांबळे, दिपक पाटील, नितीन घोगळे, आबू मिशाळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page