आ केसरकर:सिंधू-रत्न समृद्धी योजनेतून युवकांसाठी सुविधा
सावंतवाडी ता.०२-:* शहरातील बेरोजगार युवकांसाठी सिंधुरत्न योजनेमधून ३ कोटी ३६ लाख रुपये निधी खर्च करून इक्यूपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे करणार असल्याची घोषणा आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिका येथे आयोजित कार्यक्रमात केली आहे. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, नगरपरिषदेला रुग्णवाहिके बरोबर शववाहिनीसाठी नऊ लाख रुपये तरतूद आपल्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर मुख्याधिकारी जयंत जावडेकर, वसंत केसरकर ,राजू मसुरकर ,अनारोजीन लोबो, साक्षी वंजारी ,राजन पोकळे, पुंडलिक दळवी, गोविंद वाडकर व माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, कोविड साथीत रूग्णवाहीका कमतरता होती यासाठी दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी या ठिकाणी सहा अँम्बुलन्स मंजूर केल्या आहेत तर ९ लाखांची शववाहिनी देण्याची घोषणा. शीत शवपेट्याही देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी १५ कोटी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. मंदिरांना हायमास्ट दिले जाणार आहेत.
वीज बिलाची बचत व्हावी यासाठी सोलर वर चालणारे शहराला दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांनी निधी मंजूर करून सहकार्य केले. तसेच शहरासाठी शववाहिनीसाठी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन आरोग्य विभागाच्या सौ रसिका नाडकर्णी यांनी केले.
