एक कोटी गॅलरीसाठी:आ केसरकर संजू परब यांचेही सहकार्य लाभल्याचे केले स्पष्ट
सावंतवाडी ता.०२-:* शहरात तालुका क्रीडांगण होत असल्याने, या ठिकाणी आता सर्व प्रकारचे खेळ खेळले जाणार असून, जमुनाबाई पॅव्हेलियनसाठी ६ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १ कोटी क्रीडा गॅलरीसाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना येथील हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमिपूजन कार्यक्रमावेळी दिली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे तालुका क्रीडांगण होण्यासाठी सहकार्य लाभल्याने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. सावंतवाडी शहरात तालुका क्रीडांगण होण्याकरीता माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार दिपक केसरकर यांनी यावेळी बोलताना त्यांना धन्यवाद दिले. सावंतवाडी जिमखाना मैदानावर हिरवळीच्या खेळपट्टीचा भूमीपूजनाचा शुभारंभ प्रसंगी आमदार दीपक केसरकर बोलत होते.
आमदार केसरकर म्हणाले,सावंतवाडी जिमखाना मैदानावर क्रिकेट करिता आतापर्यंत एक कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले असून सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट साठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. हिरवळीच्या खेळपट्टीसाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हिरवळीच्या खेळपट्टीचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब , पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ,अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राजू बेग, अशोक दळवी, शुभांगी सुकी, दिपाली सावंत दिपाली भालेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर,सुरेंद्र बांदेकर, हिदायतुल्ला खान,अजय गोंदावळे, क्रिडापटू बाळा चोडणकर,राजन नाईक, महेश भाट आनंद आळवे, सुधीर पराडकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. आमदार दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडी संस्थानने खेळाला प्राधान्य दिले. जमनाबाई पॅव्हेलियन इमारत जुनी झाली आहे तीची पुर्नरबांधणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिमखाना मैदानावर खेळांचा इतिहास जीवंत ठेवण्यासाठी तालुका क्रीडांगण विकास प्रकल्प साकारत आहे. रोजगार दालन निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रशांत पानवेकर यांनी विविध खेळामुळे विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण होईल. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या विकास निधीचा योग्य वापर केला जातो. आमदार दीपक केसरकर, नियोजन मंडळ व वैशिष्ट्यपूर्ण निधीतून कामे होत आहेत. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या काळात ठराव मंजूर करण्यात आले त्याची पुर्तता होत आहे याचा आनंद आहे असे म्हणाले. खेळाडू राजन नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांनी तालुका क्रीडांगण विकास प्रकल्प साकारण्यात पुढाकार घेतला त्याबद्दल सर्व खेळाडूंच्या वतीने धन्यवाद दिले.
