मळगाव येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिरात एकूण ४२ जणांनी केले रक्तदान;महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सावंतवाडी ता.०२-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगाव आणि सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी १ मे (महाराष्ट्र दिनी) रोजी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, शिरोडा, बांदा या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात रक्तदाते आले होते. शिबिराच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आगरा दिल्ली येथील शरिरसौष्टव स्पर्धेत क्रमांक पटकावून मळगाव गावाची छान वाढविलेल्या प्रथमेश कातळकर, राम राऊळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, मळगाव इग्लिश स्कुलचे चेअरमन मनोहर राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र केळूसकर, मळगाव सरपंच योजना जामदार , उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सदस्य सुभद्रा राणे, देवळी, पोलीस पाटील रोशनी जाधव, मनसे विभागध्यक्ष मंदार नाईक, माजी सरपंच गणेश पेडणेकर, निलेश कुडव, गुरूनाथ गावकर, गजानन सातार्डेकर, चंद्रकांत जाधव, मळगाव इग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक राणे मॅडम आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. रक्तदान शिबिरात एकूण ६०-७० रक्तदाते आले होते. पण रक्त पिशव्याच्या अभाव झाल्याने ४२ जणांनी रक्तदान केले.

या शिबिराच्या यशस्वीततेसाठी मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब आणि उपशाखाध्यक्ष पांडुरंग बुगडे, जिल्हाध्यक्ष राजु कासकर, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, जय राऊळ, प्रथमेश राणे, साहील तळकटकर, संदिप राऊळ, पांडुरंग राऊळ, अमित बुगडे, अक्षय माळकर, सुर्यकांत गावडे आदींनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page