नवोदयमध्ये बोगस प्रवेश देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करा

केंद्राच्या अखत्यारीत नवोदय विद्यालय असल्याने खा राऊत यांचे नियंत्रण असणे महत्त्वाचे; मनसे विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये

सावंतवाडी ता.०२-:* नवोदय विद्यालय हे केंद्राच्या अखत्यारीत येत असून,जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यावर खासदारांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष पर जिल्ह्यातील पालक आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजतात तर जिल्ह्यातील शिक्षक लाखो रुपये घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करून त्यांना नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवतात. त्यामुळे अशा शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की, शिवसैनिकांनी त्या दिवशी केलेले आंदोलन स्वागतार्ह असून, मनसे त्याचे अभिनंदन करते, त्यांनी हे आंदोलन करून आपले लोकप्रतिनिधी अकार्यक्षम असल्याचे दाखवून दिले असल्याचा टोला लगावला आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी नवोदय विद्यालयात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page