जिल्हा बँकेत चाललेल्या दबावतंत्र व कारभाराच्या विरोधात तक्रार करणार
कणकवली ता२८-:* आम.नितेश राणे हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून आमिषे दाखवत व दबाव आणत भाजपा वाढविण्याचे काम करत आहेत . नोकरी बचाव , भाजप बढ़ाव हे काम जिल्हा बँकेचा वापर करून ते करत आहेत . याचा आम्ही निषेध करतो. जिल्हा बँकेच्या १०० दिवसांच्या कारभारची वाट पाहिली मात्र या कालावधीत नितेश राणेच्या नेतृत्वाखाली मनमानी कारभार सुरू आहे .या साऱ्याच्या विरोधात खास.विनायक राऊत , पालकमंत्री उदय सामंत , आम. दिपक केसरकर , आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे .
जिल्हा बँकेत चाललेल्या दबावतंत्र व एकूण कारभाराच्या विरोधात मुख्यमंत्री सहकारमंत्र्यांसहीत नाबार्ड प्रबंधक सहकारच्या जॉईंट रजिस्टार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते . यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,युवा सेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक , राजू राठोड , नगरसेवक कन्हैया पारकर , उत्तम लोके , रुपेश आमडोसकर , महेंद्र डिचवलकर आदी उपस्थित होते .
सतीश सावंत म्हणाले,आमदार नितेश राणे यांनी जिल्हा बँकेतील कर्मचारी , नातेवाईकांवर दबाव आणत , धमक्या देत भाजपात प्रवेश घेत आहेत . नोकरी बचाव , भाजप बढ़ाव हे काम जिल्हा बँकेचा वापर करून ते करत आहेत . जिल्हा बँकेचे ओरोसचे हेड ऑफिस नितेश राणे यांनी स्वतःच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राजकीय अड्डा बनविला आहे . स्वत : स्विकृत सदस्य होत ते बेनामी चेअरमन बनले असून मनिष दळवी हे बाहुले म्हणून काम करत आहेत . नागवे सरपंचाना मुलाला जिल्हा बँकेतील नोकरीवरून काढण्याची धमकी देत प्रवेश घेतला . त्यांनी आपली कैफियत मला सांगितली .
करंजेचे माजी उपसरपंच जिल्हा बँकमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीला असून त्यांना धमकी देत प्रवेश घेतला . घोणसरीच्या शिवसेना कार्यकर्त्यांला घेतलेल्या कर्जाबाबत घर जप्ती करण्याची धमकी देत प्रवेश घेतला आपण साडेसहावर्षे चेअरमन म्हणून काम केले या कालावधीत कधीही पक्षीय राजकारण आणले नाही . आमदारांसोबत शेडेकर चिखलफेकीत असलेल्या कार्यकर्त्यांची पत्नी नोकरीला होती . आमदारांचा सख्या चूलत भाऊ बँकेत आहे आम्ही त्यांच्याबाबत असे कधीच वागलो नाही . रोजीरोटी , पोटावर पाय आणण्याची शिवसेनेची संस्कृती नाही . काही एनपीएतील खाती केवळ व्याज भरून नियमित दाखविण्यात येत आहेत .
याबाबतही नाबार्ड व सहकारच्या जॉईंट रजिस्टारकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सतीश सावंत म्हणाले . वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सदस्यांचा मुलगाही जिल्हा बँकेत असून त्यांच्यावरही प्रवेशासाठी दबाव आणला जात आहे . जिल्हा बँकेचे हेड ऑफीस राजकीय अड्डा बनविण्यात आला आहे . जिल्हा बँकेच्या प्रगतीत यांचे कोणतेही योगदान नाही . दहशत व संतोष परब हल्ल्याच्या माध्यमातून जिल्हा बँक मिळवून स्वत : चे ऑफिस म्हणून वापर होत आहे . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही यात प्रशासन म्हणून कारवाई करत नाहीत . आम्ही चेअरमन असताना आम्हाला मदत केलेल्या कर्मचाऱ्यांची सीईओ बदली करत आहेत . काही कर्मचाऱ्यांना सोसायटीच्या निवडणूकीसाठी प्रचार करण्यास लावले जाते .
त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत स्वतःच्या बँकेत ठेवी नाहीत , योगदान नाही . संस्था थकीत असल्याने मतदानाचा अधिकारही नसताना स्विकृत सदस्य होत आता बेनामी चेअरमन म्हणून काम करत असल्याचे श्री . सावंत म्हणाले. ज्यांची ५० हजारची थकबाकी आहे , त्यांच्याकडे बँकेची बलोरो वसूलीसाठी जाते . पण ज्या सात बलेरो २०१४ मध्ये घेतल्या त्यांची १ कोटीची रक्कम थकीत आहे . आम्ही असताना १०१ ची कारवाई पुर्ण झाली . त्याबाबत बँक प्रशासन पुढील कोणतीही कार्यवाही करत नाही . आम.नितेश राणे हे बँकेच्या माध्यमातून आमिषे दाखवत व दबाव आणत भाजपा वाढविण्याचे काम करत आहेत . या साऱ्याच्या विरोधात खास.विनायक राऊत , पालकमंत्री उदय सामंत , आम. दिपक केसरकर , आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे . आम्ही त्यांच्या १०० दिवसांच्या कारभारची वाट पाहिली .
या कालावधीत नितेश राणेच्या नेतृत्वाखाली मनमानी कारभार सुरू आहे . दुधाचे २.७७ कोटी मिळलेले नाहीत . बोलेरो वसूली नाही , या साऱ्याच्या विरोधात जनआंदोलन उभारणार आहोत . प्रशासन दबावाखाली काम करत असून त्याबबात हेड ऑफिससमोरही आंदोलन छेडणार तसेच संचालक सुशांत नाईक या साऱ्याबाबत आता आक्रमक भूमिका घेत आहेत काही कर्जप्रकरणांत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून काम करण्यास भाग पाडले जात आहे . शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना बँकेतून कमी करण्यात आले . त्यानंतरही हंगामी म्हणून भरती सुरू आहे . याबाबतही आम्ही सहकार खात्याकडे दाद मागणार
