Headlines

तळवडे नं ४ मध्ये माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मेळावा

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आयोजन

सावंतवाडी ता.२८-:* महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा शारदा विद्यामंदिर तळवडे नं. ४ येथे आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ बंधू आणि भगीनी यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा: स. ७.०० वा. ध्वजारोहण, स. ९.०० वा. सत्यनारायण महापूजा / आरती, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद, दु. ३ ते ६ वा. आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ , शिक्षक यांचा भजनादी कार्यक्रम, सा. ६ ते ८ आजी माजी विद्यार्थी सांस्कृतीक कार्यक्रम, रात्री ८ वा.आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा रक्तसिंचन हा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे

You cannot copy content of this page