*⚡सावंतवाडी ता.२८-:* माजगाव येथील बदली पास घोटाळ्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात वनविभागाचे तात्कालीन वनपाल चंद्रसेन विष्णू धुरी रा.सावंतवाडी जुनाबाजार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी आवाज उठऊन पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.
अखेर मुंबई उच्चन्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी वनपाल श्री धुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहीती श्री बरेगार यांनी दिली. तर माणगाव वनपाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आपली मागणी असून प्रशासनाला पंधरा दिवसाची मुदत दिली आहे, येथील मुदतीत गुन्हा दाखल न झाल्यास आपण १२ मे ला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
