सावंतवाडी ता.२८-:* तळवडे चे श्रध्दास्थान व ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिर चा 13 वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार 6 मे रोजी होत आहे या निमित्त श्री सिध्देश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
यात सकाळी ७.०० ते १२.३० वा. धार्मिक विधी सोहळा, दुपारी १२.३० ते १.०० वा. आरती व गाऱ्हाणे, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, संध्याकाळी ४.०० ते ७.०० वा. श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ, उभादांडा (मुठवाडी) वेंगुर्ला यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच रात्री ८.०० ते ९.०० वा. महिलांसाठी खेळ खेळू पैठणीचा व रात्रौ ९.०० ते १२.०० वा. नृत्यधारा 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी तसेच सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गांवकर मंडळी, देवस्थान व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आले
