सावंतवाडी ता.२८-:* वेस्टर्न डान्स ऑल इंडिया या स्पर्धेत माजगाव येथील कु. भक्ती प्रभाकर दळवी या तरुणीने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकावला तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे देशातील २०० पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
ऑल इंडिया डान्स चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा पणजी गोवा येथे दि. १५/१६/१७ एप्रिल रोजी संपन्न झाली येथील तालुक्यातील माजगाव सारख्या ग्रामीण भागातून कु. भक्ती प्रभाकर दळवी वय २१ ही या स्पर्धेत सहभागी झाली होती या स्पर्धेत तिने स्वतःच्या नृत्यकौशल्याने राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला सिनेअभिनेत्री व नृत्य विशारद सुधा चंद्रन यांच्या हस्ते तिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कु. भक्ती ही सावंतवाडीतील श्री. शूटर डान्स अकॅडमीची विद्यार्थिनी आहे तिला या अकादमीचे प्रशिक्षक निलोफर नाईक व शुभम शितोळे यांचे सहकार्य लाभले यापूर्वी देखील तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता तर मुंबई येथील “द डान्स स्टेज रियालिटी शो” च्या ऑडिशन मध्ये भाग घेऊन दिल्लीतील स्पर्धेसाठी सिलेक्ट झाली होती गुडगाव नवी दिल्ली येथील स्पर्धेत तिला बेस्ट फिमेल अॅक्टर म्हणूनही अवॉर्ड मिळाला आहे
