मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केली मागणी
कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कडून लोडशेडींग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र हे लोडशेडींग पूर्णतः चुकीचे आहे. या लोडशेडींग मुळे जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली आहे. लोडशेडिंग बंद करावे तसेच अनामत रक्कम देखील अन्यायकारक आहे.या अनामत रकमेची वसुली देखील तात्काळ थांबाविण्यात यावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केली. या संदर्भात मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली निलेश मेस्त्री, सोनू तांबे यांनी वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.दिवस रात्री अधून मधून करण्यात येणारे हे लोडशेडींग जिल्ह्यातील जनतेवर एकप्रकारे अन्यायच आहे.
तसेच उन्हाळा असल्याने, वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. पंखे, वातानुकुलीत यंत्रे घराघरात चालु असतात. मात्र वीज कपाती मुळे जनता त्रस्त झाली आहे.जिल्ह्यात वीज वापर हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अल्प प्रमाणात आहे. थकबाकी देखील अल्प आहे. वीज चोरीचा अवलंब देखील केला जात नाही. अशा या जिल्ह्यात वीज कपात करणे अन्यायकारक आहे.तरी जिल्ह्यातील वीज कपात तात्काळ बंद करण्यात यावी. .
त्याच प्रमाणे जनतेकडून वसुल करण्यात येणारी अनामत रक्कम घेण्यात येत आहे.ही अनामत रक्कम देखील अन्याय कारक आहे.या अनामत रकमेची वसुली देखील तात्काळ थांबाविण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.
