देवगड खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने वैशिष्ठ पूर्ण योजना मे २०२१ अंतर्गत मंजूर झालेल्या देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड निपाणी रस्ता सोहनीवाडी रस्ता (सुमारे १८.४६ लाख खर्चाच्या ) मार्गाचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक विशाल मांजरेकर यांच्या हस्ते नगराध्यक्षा साक्षी प्रभु,बांधकाम सभापती तेजस मामघाडी, आरोग्य शिक्षण सभापती,नितीन बांदेकर,नगरसेवक निवृत्ती तारी ,युवा सेना अधिकारी निनाद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी डॉ के.एन.बोरफळकर,जेष्ठ शिवसैनिक दादा पडेलकर, माजी नगरसेवक हर्षा ठाकूर,महिला संघटक स्वप्नाली वाल्मिकी ,केतन खाडये व अन्य उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांच्या या वैशिष्ठ पूर्ण योजनेत उर्वरित दोन विकास कामांमध्ये (१०.१०लाख)बापट घर,जोडरस्ता,आणि दिर्बादेवी मंदिर परिसर हायमॅक्स टॉवर बसविणे( रु १.३५ लाख) या विकास कामांचाही समावेश आहे.
