मालवण ता.२५-:* “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधत गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती मालवणच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत आडवली हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेतील “तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत” प्रशालेची विद्यार्थिनी-कु.साक्षी विद्याधर तुळपुळे हिने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक तर कु.अनुष्का अनिल तांडेल या विद्यार्थिनींने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रशालेतून कु.साक्षी तुळपुळे हिने सहभाग नोंदविला होता.या वक्तृत्व स्पर्धेत साक्षीने प्रथम क्रमांक पटकावून सुयश संपादन केलेले आहे.
तसेच ती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे.तसेच तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कु.अनुष्का अनिल तांडेल हिने देखील द्वितीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे.वरील दोन्ही विद्यार्थिनीच्या सुयशाचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे. कु.साक्षी विद्याधर तुळपुळे व कु.अनुष्का अनिल तांडेल या विद्यार्थिनींना वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी प्रशालेचे सहा.शिक्षक श्री.एस.जी.झाडे सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल , त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
