गोवा पर्यटकांच्या गाडीला सावरवाड येथे अपघात…

पर्यटक सुदैवाने बचावले; पोलिसांच्या जुन्या तपासणी नाक्याचा शेडमध्ये घुसली गाडी

मालवण (प्रतिनिधी) कसाल- मालवण मुख्य रस्त्यावरील सावरवाड येथील पोलिसांच्या जुन्या तपासणी नाक्याच्या मुख्य इमारतीवर गोवा येथील पर्यटकांच्या मारुती सुझुकी एर्टीगा गाडीने धडक देत गाडी थेट इमारतीच्या शेडमध्ये घुसली.

हा अपघात आज सोमवारी सायंकाळी घडला. सुदैवाने या अपघातात गाडीतील पर्यटक आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर राष्ट्रवादीचा काल झालेला मेळावा आटोपून गोवा येथील पर्यटक मालवण येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. हे पर्यटक आपल्या एर्टीगा गाडीतून मालवणहून गोव्याला परतीच्या प्रवासाला निघाले. मालवण कसाल मार्गावरून जात असताना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पर्यटकांच्या गाडीने सुकळवाड येथील जुन्या पोलीस चेक नाक्याच्या इमारतीला जोरदार धडक दिली. या धडकेत इमारतीचा दगडी कठडा फोडून गाडी थेट इमारतीच्या शेड मध्ये घुसली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गाडी इमारतीवर आदळताच चालकाच्या आणि शेजारील प्रवाशांच्या समोरील एअरबॅग्स उघडल्या गेल्याने चालकासह पुढील प्रवासी तसेच गाडीतील दोन महिला सुदैवाने बचावल्या.

You cannot copy content of this page