९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादर केली गझल; गझलला मिळाला होता उत्स्फूर्त प्रतिसाद
देवगड-प्रतिनिधी लातूर जिल्हयातील उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये देवगडच्या कवियित्री व गझलकार उत्तरा जोशी यांनी गझल सादर करुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गझलला उत्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काहि निवडक कवी,गझलकार यांना कविता व गझल सादर करण्याची संधी मिळाली यामध्ये देवगडच्या कवयित्री व गझलकार उत्तरा जोशी यांनी अतिशय सुंदर अशी गझल सादर करुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील उपस्थितांची मने जिंकून उपस्थित मान्यवरांकडूनही कौतुक करण्यात आले.
राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी गझलकार उत्तरा जोशी यांचे विशेष कौतुक केले. सदयाच्या वस्तुस्थितीनुसार म्हणजेच राजकीय घडामोडी,सामाजिक व अन्य घटनांवरती अतिशय सुंदर कविंनी व गझलकारांनी मार्मिक भाषेमध्ये आपल्या कविता व गझल सादर केल्या यामधून जनतेमध्ये प्रबोधनाचे कामही कवि,गझलकार व साहित्यिक करीत आहेत. कवि व गझलकार उत्तरा जोशी यांनी अनेक आपल्या गझल या आधी वेगवेगळया व्यासपिठावरती सादर केल्या आहेत.
गोवा,महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहून आपल्या गझल सादर केल्या आहेत. फेसबुक व सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या गझल अनेकजन प्रसिध्द करीत असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. फोटो- उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझलकार कवयित्री उत्तरा जोशी यांचा सन्मान करताना मंत्री संजय बनसोडे
