मालवण ता.२५-:* ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनाची संध्याछाया आनंदात जाण्यासाठी कथाकथन व कथावाचन हे छंद जोपासवेत असे आवाहन क्रांती स्मृती डी.एड. काॕलेज सातारा चे सेवानिवृत्त प्राध्यापक साहित्यभूषण चंद्रशेखर हडप यांनी येथे बोलताना केले. जागतिक पुस्तक दिन आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे यांचा स्नेहमेळावा यांचे औचित्य साधून साहित्यिक चंद्रशेखर हडप यांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी कथाकथन कार्यक्रम संपन्न झाला.
हडप यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या़ची शेलारशाखिंड, बेलभंडार, तुळशीबाग आदी कथा कथन केल्या. साहित्यातील बाळ कोल्हटकर, आचार्य अत्रे यांचे काही किस्से कथन केले. बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या या कथाकथनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला बाबाजी भिसळे, अशोक कांबळी, सुधीर शिवेश्वरकर, श्रीकांत सांबारी, लक्ष्मण आचरेकर, सुरेश गावकर, जकारीन फर्नाडीस, सुरेश ठाकूर, बाजेल फर्नांडीस, अरुंधती कांबळी, प्रकाश पुजारे, सुरेश ठाकूर आदी ज्येष्ठ नागरिक सेवासंघाचे पदाधिकारी यांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
