सावंतवाडी येथील ब्राम्हण समाजाची निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार
*⚡सावंतवाडी ता.२५-:* आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबाबत आणि हिंदू धर्मातील धार्मिक संस्काराबाबत बेताल वक्तव्य करून, समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत लेखी तक्रार आज सावंतवाडी येथील ब्राम्हण समाजाने पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांच्यावर फौजदारी दखलपात्र आणि अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी बाळ पुराणिक, शिवानंद भिडे, अँड अमित देऊसकर, गुरुदास देवस्थळी यांनी ही तक्रार दिली आहे.
