कुंभारमाठ शाळेच्या शाळा पूर्व तयारी उपक्रमाला शिक्षण उपसंचालकांची भेट

ओरोस ता.२५-:शाळापूर्व तयारी मेळाव्याचे औचित्य साधत शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी मालवण तालुक्यातीलकुंभारमाठ नंबर 1 शाळेला भेट देत पाहणी केली.

एप्रिल 2022 मध्ये पहिल्या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन सर्व शाळांमध्ये केले जात आहे .कुंभारमाठ नंबर 1 शाळेतही मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची शाळा भेट सर्वांच्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायी ठरली आहे. कुंभारमाठ शाळा १ स्तरावर आयोजित शाळापूर्व तयारी उपक्रमाचे उदघाटन करतानाच त्यांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रत्येक स्टॉलला भेट, उपस्थितांशी हितगुज या सर्वांमध्येच सहभागी होऊन खूप छान असा आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळे निश्चितच शिक्षण उपसंचालक चोथे यांची ही भेट शाळेसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, कुंभारमाठ केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, सरपंच प्रमोद भोगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूजा हळदणकर, अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page