*⚡ओरोस ता.२५-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग महिला सेल जिल्हा मेळावा व दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड 2022 चे वितरण २७ एप्रिल रोजी मांगल्य मंगल कार्यालय वेताळ-बांबर्डे कुडाळ येथे दुपारी २ ते सायं ६ या वेळेत संपन्न होणार आहे.
यावेळी राज्याध्यक्ष देविदास बसवदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य सल्लागार प्रकाश दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
