सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले भाजपात…

सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

त्यांच्या भाजप प्रवेशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणिते बदलली जाण्याची शक्यता आता वर्तवली जात असून, आगामी काळात तालुक्यात मोठे फेरबदल होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रसाद लाड, आदी भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page