आचरा ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन २ रोजी

मालवण ता.२५-:* आचरा गाऊडवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा २ मे रोजी साजरा होणार आहे. सकाळी ९ वा. सत्यनारायण महापूजा, ११ वा. महाआरती, ११.३० वा. तिर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. राज्यस्तरीय निमंत्रित संघांची दिवस- रात्र शूटिंगबॉल स्पर्धा होईल. प्रथम पारितोषिक २१ हजार, द्वितीय १९ हजार, तृतीय १४ हजार, चौथा क्रमांक ११ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन ब्राह्मणदेव गाऊडवाडी मित्रमंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page