भाजपा चित्रपट कामगार आघाडीचा 28 रोजी पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम

कणकवली 25 एप्रिल (प्रतिनिधी)-भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे कामगार नेते, संजय केणेकर, कामगार आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष गणेश ताठे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय सरोज , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका आणि जिल्हा पदाधिकारी आणि सदस्य नियुक्ती कार्यक्रम गुरूवार २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता मालवण भाजप तालुका कार्यालय येथे होणार आहे .

हा कार्यक्रम माजी खासदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच प्रदेश सदस्य दत्ता सामंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस अशोक सावंत, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, शहर मंडल अध्यक्ष दिपक पाटकर, शहर प्रभारी विजू केनवडेकर, भाई मांजरेकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. लक्ष्मी पेडणेकर, शहर अध्यक्षा सौ अन्वेशा आचरेकर, नगरसेविका सौ. पूजा करलकर, नगरसेविका सौ. ममता वराडकर, नगरसेविका सौ. पूजा सरकारे तसेच भाजपातील सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदरहू कार्यक्रम पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती भाजपा चित्रपट कामगार आघाड सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा , सौ.नमिता प्रदिप गावकर आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गितेश प्रकाश शेणई,यांनी केली आहे .

You cannot copy content of this page