मालवण ता.२५-:* जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी संघाच्या अध्यक्षपदी अशोक कांबळी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश गांवकर आणि कार्यवाह पदी जे एम फर्नांडिस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी संघाची बैठक मावळते अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी संघाची अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, सहकार्यवाह बाजेल फर्नांडिस, तर खजिनदार पदी प्रकाश पुजारे यांची निवड करण्यात आली. महिला आघाडी प्रमुख म्हणून श्रीमती मनाली फाटक यांची निवड करण्यात आली. सल्लागार पदी लक्ष्मण आचरेकर, सुरेश ठाकूर, सौ अरूंधती कांबळी, यांची निवड करण्यात आली.
विशेष मार्गदर्शक म्हणून बाबाजी भिसळे यांची निवड केली गेली. वाडीवार प्रतिनिधी म्हणून दिपक आचरेकर, बाबा कदम,राजन राजाध्यक्ष, पांडुरंग वायंगणकर, सौ सुवर्णलता पांगे, गोविंद गांवकर, सुमंत कुबल,हरी पवार, यांची निवड करण्यात आली.
