Headlines

शहरातून बेपत्ता झालेला मुलगा सापडला कोल्हापूर नृसिहवाडी मध्ये…

*⚡सावंतवाडी ता .२४-:* शहरालगत असलेल्या चराठा तिलारी कॉलनी येथून बेपत्ता झालेला मुलगा थेट कोल्हापूर-नृसिहवाडी येथे आढळून आला दिपराज धनराज सजगुरे (१५) असे त्याचे नाव आहे तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

त्याला आणण्यासाठी त्याचे नातेवाईक सावंतवाडीतून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत मात्र तो बेपत्ता का झाला ? त्याने सावंतवाडी ते कोल्हापूर प्रवास कसा केला ?याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही दिपराज हा आज रविवारी सकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता दरम्यान तो दुपारी जेवायला घरी आला नाही त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी त्याची सायकल येथील जिमखाना परिसरात आढळून आली त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही त्यामुळे याबाबतची खबर त्याच्या वडिलांनी येथील पोलिस ठाण्यात दिली घटनेची माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली व सोशल मीडियाच्या आधारे संबंधित मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले या आवाहनानंतर तो मुलगा कोल्हापूर-नृसिंहवाडी पोलीसांच्या दृष्टीस पडला त्याच आवाहनाच्या आधारे नृसिंहवाडी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची संपर्क साधला त्याला ताब्यात घेत तो सुखरूप असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली त्यानुसार त्याचे नातेवाईक कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत त्यामुळे त्याच्या वडिलांनी श्री.जाधव यांचे आभार मानले आहेत

You cannot copy content of this page