२० पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण…
सावंतवाडी ता.२४-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत चराठा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे नंबर एक च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून शाळेतील 20 पैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागला.
यामध्ये तिसरीतील आस्था अमित लिंगवत हिने शंभर पैकी 94 गुण मिळवत सुवर्णपदकासह जिल्ह्यात द्वितीय तर सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच इयत्ता पाचवीतील सोहम कोरगांवकर 84 गुण सुवर्णपदक, इयत्ता चौथीतील श्रावणी सोमवंशी 79 गुण कांस्यपदक, सातवीतील आयुष परब 68 गुण कांस्यपदक प्राप्त केले इयत्ता दुसरी तील पार्थ बोलके 81 गुण, तिसरीतील सिया नाईक 75 गुण गौरांग सावंत 70 गुण आराध्या देसकर 53 गुण, 7 वी तील यश कुडतरकर 51 गुण या मुलांनी यश संपादन केले या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालक यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका वर्षा देसाई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक सरपंच रघुनाथ वाळके गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले
