सावंतवाडी ता 24: ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सेंट फ्रान्सिस झेवियर इंग्लिश मीडियम आरोंदा येथील आर्यन डिगंबर कोरगांवकर 8 वी याने सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत 49 वे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावत यश संपादन केले त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
गेल्या वर्षी देखील आर्यन हा ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता याकामी त्याला आई-वडिलांचे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले गणित विज्ञान व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित या परीक्षेमध्ये आठवीत शिकणाऱ्या आर्यनने घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
