मालवण ता.२३-:* मालवण एसटी आगारातून दि. २९ एप्रिल रोजी मालवाहतूक गाडी सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे. सदर गाडीचा मार्ग मालवण पनवेल- नेरुळ- वाशी-ठाणे-भांडुप-बोरिवली जोगेश्वरी-सायन-परेल-मुंबई सेंट्रल असा राहणार आहे. तसेच १ मे रोजी मुंबई ते मालवण परतीची ते माल वाहतूकपण उपलब्ध असणार आहे. आंबा, नारळ, काजू कोकम व अन्य माल यांची स्वस्त व सुरक्षित वाहतूक केली जाणार आहे.
मालाची वाहतूक करायची असणाऱ्यांनी मालवण एसटी नियंत्रण कक्षाशी (०२३६५-२५२०३४) संपर्क साधावा, असे आवाहन मालवण आगाराने केले आहे.
