मत्स्यव्यावसायिक विजयश्री तांडेल यांचे निधन

*⚡मालवण ता.२३-:* मालवण सर्जेकोट येथील प्रसिद्ध मत्स्य उद्योजिका श्रीमती विजयश्री उर्फ प्रेमा भगवान तांडेल (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. तांडेल यांनी मस्य विक्रीतून आपल्या कुटुंबाला भक्कम आधार निर्माण केलं होता. त्यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात सर्जेकोट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री भद्रकाली मत्स्य व्यवसाय सोसायटी चेअरमन कृष्णानाथ तांडेल, मत्स्य उद्योजक गोपीनाथ तांडेल यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page