अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा : तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी दिले देवगड आगार व्यवस्थापकाना पत्र
देवगड ता.२२-:* देवगड बसस्थानक वरील बंद असलेले पंखे,प्रसाधनगृहातील खंडित विद्युत सुविधा,स्वछता,पिण्याचे स्वच्छ पाणी या प्रमुख समस्या तात्काळ निवारण करण्यात येऊन प्रवाशांना पुरेश्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यानी लेखी पत्राद्वारे देवगड आगार व्यवस्थापक याना दिला आहे.
या संदर्भात आगार व्यवस्थापक यांचेशी चर्चा करून वस्तुस्थिती मांडली तसेच बंद पंखे,प्रसाधनगृहातील बंद दिवे निदर्शनास आणून देऊन विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला.व तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. या वेळी सचिव जगदीश जाधव,उपाध्यक्ष महेश नलावडे,शहर अध्यक्ष सचिन राणे,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पपु जाधव उपस्थित होते.
