अखेर तो मृतदेह शोधण्यास मालवण येथील आपत्कालीन पथकाला यश..

*सावंतवाडी ता.२०-:* शहरातील मोती तलावाकाठी दुचाकी पार्क करून तलावात उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास मालवण येथील आपत्कालीन पथकाला ला यश आले आहे. आज सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने तलावाच्या काठावर आपली दुचाकी पार्क करून मोती तलावात उडी घेत आत्महत्या केली होती. त्या व्यक्तीने आत्महत्या का केली याबाबत अजुन माहिती मिळाली नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत

You cannot copy content of this page