कळसुली प्रकल्पग्रस्तांनी ठाकरे सरकारचे मानले आभार
कणकवली ता.२०-:* कणकवली तालुक्यातील कळसुली देंदोनवाडी प्रकल्पांतर्गत ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या ५६ कोटी निधीतील प्रस्तावित विविध विकास कामांचे भूमिपूजन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खास.विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं आहे. माघील चार महिन्यांपूर्वी कळसुली पुनर्वसनमधील ग्रस्तांची भेट घेऊन, प्रकल्प ग्रस्तांची प्रलंबित कामे पुर्ण करु असे आश्वासन मा.खासदारांनी पुनर्वसन येथील ग्रामस्थांना दिले होते. कळसुली या प्रकल्पाच्या पर्यायी मार्ग,रस्ते दुरुस्ती,कॅनॉल बांधणे,धरण दुरुस्ती करणे,पाणी पुरवठा करणे अशा विविध उर्वरीत विकास कामे पुर्ण करण्यासाठी सुरुवात करण्यात आली.
विकास कामांतर्गत मंजूर रस्ता कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना खासदारांनी योग्य ते बदल करण्याच्या सूचना दिल्या.पुनर्वसन मधील पाणी टंचाई वर लवकरच तोडगा काढणार असल्याची माहिती राऊत म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते,माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक,राजू राठोड, अतुल दळवी,चंदू परब, सुशांत दळवी, सहदेव नाईक, दिगंबर सुतार, संतोष सुतार, संतोष मुरकर, बळीराम राणे,दिनकर दळवी,मधू चव्हाण,कांता दळवी,राजू राऊत, चंद्रकांत दळवी, दिगंबर नाईक, रामचंद्र नाईक,श्री काणेकर,रवी घोगळे, तसेच प्रकल्प अधिकारी श्री.हिरेगौडर, रुपेश राणे सह पुनर्वसन मधील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
