जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी घेतली सीएमजीएसवाय कार्यकारी अभियंत्यांची भेट;१ मे रोजी उपोषण करण्याचा उपसरपंच शिवाजी परब यांचा इशारा
सावंतवाडी ता.२०-:* आंबेगाव मधलीवाडी ते माडखोल हद्द रस्त्याच्या धीम्या गतीने होत असलेल्या कामाबाबत भाजपचे सिंधुदुर्ग सरचिटणीस तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांची भेट घेत रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त केली. तर 30 एप्रिल पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण न झाल्यास आंबेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी उर्फ संजू परब यांनी 1 मे महाराष्ट्रदिनी ग्रामस्थांसहित कार्यलयासमोर उपोषणाचा इशारा दिला.
यावेळी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी,बूथ कमिटी अध्यक्ष संतोष राणे उपस्थित होते
