सुजित जाधव यांचा महावितरणला इशारा
कणकवली ता.१८-:* कणकवली सोनगेवाडीमधील ओमनगर परिसरात विजेच्या समस्या वारंवार निर्माण होत आहे.या समस्या सोडविण्याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या मात्र , संबंधितांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे आपणास आम्ही हे शेवटचे स्मरणपत्र देत आहोत.
विजेच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या नाहीत.तर आम्ही यापुढे येणारे कोणत्याही प्रकारचे लाईट बील भरणा करणार नाही,असा इशारा महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे,प्रकल्प येडगुळकर,यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामीण विकास यंत्रणा समितीचे सदस्य सुजित जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सोनगेवाडीमधील एकलाईन ही ग्रामीण भागाला जोडल्यामुळे बहुतेक वेळा शहरात विद्युत पुरवठा सुरळीत असताना या भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो .
त्यामुळे या भागातील सर्व लाईन जोडणी ही शहरातील जोडणीला जोडावी.ओमनगर येथील सौ.कुडाळकर यांच्या घरसमोरील झाडाच्या फांद्या विद्युत लाईन वरून गेल्यामुळे त्या वारंवार तुटून विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे त्या फांद्या तोडण्यात याव्या. ओमनगर फाट्यावर व श्री . सावंत यांच्या घरासमोरील पोल पूर्णत : झुकलेला आहे. त्यामुळे तो पोल सरळ करण्यात यावा , अन्यथा पावसाळ्यात हे दोन्ही पोल पडण्याची शक्यता आहे . ओमनगरमधील श्री . मढव यांच्या घराशेजारील पोल गंजलेला आहे तो बदलणे गरजेचे बनले आहे . शाळा नंबर १ जवळील पोल ही गंजलेला आहे तो बदलने अत्यंत आवश्यक आहे कारण त्या ठिकाणी विद्यार्थी व बाजारातील वर्दळ कायम चालू असते , कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सावधगिरी म्हणून हा पोल बदलणे आवश्यक आहे. श्री.मांजरेकर यांच्या घरासमोरील लाईनवर झाडाच्या फांद्या वाढल्या आहेत त्या पावसाळ्यात तुटून लाईनचे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेता त्या फांद्या तोडण्यात याव्या,अशा मागण्या श्री .जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
