कणकवली ता.१८-:* कणकवली महाविद्यालयातील सन 1986- 87 बॅचचे कॉलेजमेट्सचे गेटटुगेदर शिवडाव येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी जुन्या आठवणीना उजाळा देतानाच जीवनातील सुख दुःखाचे प्रसंग एकमेकांना शेअर करीत एक दिवस आनंदात पार पडला. मुंबई येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष शिरसाट आणि एसएम हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका भाग्यरेखा दळवी यांच्या निवासस्थानी कणकवली कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते.
यामध्ये भाग्यरेखा दळवी, संध्या पावसकर, संध्या वायंगणकर, मेधा चौगुले-पचोरे, सुनंदा पारकर, सीमा रानडे-नानिवडेकर, तनुजा पेडणेकर, वंदीता अंधारी, सुलभा पारकर, नंदिता पेटकर, संतोष वायंगणकर, ज्ञानेश पाताडे, विलास रासम, सुभाष शिरसाट, विश्वनाथ गुरव, राजू काळसेकर या मित्रमंडळींचा समावेश होता.यावेळी अनेकांनी गतस्मृतींना उजाळा दिला.
